Category: Uncategorized

कोरोनामुळे केश कर्तनालय – सलून व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण – समस्या व त्यावरील उपाय – मार्गदर्शक तत्वे -डाॅ संदीप कडवे

*कोरोनामुळे केश कर्तनालय – सलून व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण – समस्या व त्यावरील उपाय – मार्गदर्शक तत्वे *
लोकडाऊन नंतर जेव्हा सलून सुरु होतील. सलून हि जवळपास अत्यावश्यक सेवा आहे. कोरोनाचा धोका पुढील काही महिने तरी कायम राहणार आहे. तेव्हा काम कसे करायचे असा प्रश्न नाभिक कारागिरांना व मालकांना पडला आहे. सलून मध्ये काम करतांना सर्व नाभिक कारागिरांचा ग्राहकाशी थेट संपर्क येतो. येणाऱ्या ग्राहकांमध्ये कोण आजारी आहे हे कळत नाही. कुणी शिंकले, खोकले तरी व्यावसायिकांना, कारागिरांना, येणाऱ्या ग्राहकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. ग्राहकांमध्ये देखील यासंबंधी काळजीचे वातावरण आहे.
यावर उपाय म्हणून डॉ संदीप कडवे यांनी खालील मार्गदर्शक तत्वे नाभिक मंडळांना / नाभिक महामंडळाला सुचवली आहेत. यावर चर्चा करून नाभिक मंडळांनी / महामंडळाने आपली मार्गदर्शक तत्वे सर्व ग्राहकांसाठी लागू करावी अशी विनंती केली आहे.

१. आजारी माणसांनी स्वतःहून केश कर्तनालयात येऊ नये. आल्यास त्यांना प्रवेश नाकारण्याचा सर्व हक्क सलून व्यवस्थापनाला असेल. प्रसंगी दंड देखील करण्यात येईल. अधिक आक्रमक ग्राहकांची नावे पोलीस प्रशासनाला कळवण्यात येतील व त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
२. येणाऱ्या सर्व ग्राहकांनी चेहऱ्यावर मास्क लावावा. कारागिरांनी देखील तोंडावर कायम मास्क लावावा.
३. ग्राहकाची दाढी करतांना ग्राहकाचा फक्त मास्क काढला जाईल.
४. येणाऱ्या सर्व ग्राहकांनी स्वतःसाठी मोठा नॅपकिन, पंचा आणावा जो मानेभोवती/अंगाभोवती गुंडाळता येईल. केस कापून झाले, दाढी करून झाली कि हा पंचा ग्राहकाने घरी घेऊन जावा. काही आठवड्यानंतर सलून मध्येच असे पंचे ग्राहकांसाठी विकत मिळतील.
५. जे ग्राहक स्वतःचा पंचा घेऊन येणार नाहीत, त्याच्यासाठी निर्जंतुक केलेला, न वापरलेला पंचा (जमल्यास डिस्पोझेबल किंवा एकदा वापरून मग धुण्यात येणारा) उपलब्ध करून देण्यात येईल त्याचा प्रत्येकी १५ रुपये वेगळा शुल्क आकारण्यात येईल. नंतर हे देखील सेवा बंद करण्यात येऊन सर्व ग्राहकांनी स्वतःचे पंचे विकत घ्यावे लागतील.
६. केस कापणे, दाढी करणे, या साठी एका ग्राहकांमागे १५ रुपये अधिक स्वच्छता शुल्क आकारण्यात येईल. याचा उपयोग सलून मध्ये अधिकची स्वच्छता राखणे, कात्री, वस्तरा वारंवार निर्जंतुक करणे, फरशी वारंवार झाडणे, डेटॉल ने फरशी व खुर्ची पुसणे या कामाकरता केला जाईल. सर्व ग्राहक चपला बूट दुकानाबाहेर काढतील. यासाठी जमल्यास एका स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल.
७. येणाऱ्या सर्व ग्राहकांचे नोंदणी रजिस्टर बनवण्यात येईल. यात ग्राहकाचे नाव, मोबाईल फोन, पत्ता वय, लिहिण्यात येईल.
८. कारागिरांच्या स्वच्छतेविषयी व आरोग्याविषयी अधिक काळजी घेण्यात येईल. आजारी कारागीर कामावर येणार नाहीत. किरकोळ सर्दी,ताप, खोकला यासाठी कारागीर कामावर न आल्यास सुरवातीचे ३ दिवस रजा पगारासहित देण्यात येईल. हा खर्च आपत्कालीन निधी मधून करण्यात येईल.
९. कारागिरांचा आरोग्य विमा काढण्यात येईल.
१०. प्रत्येक सलूनमध्ये दररोजच्या उत्पन्नातून एक आपत्कालीन निधी गोळा केला जाईल. हा निधी पुढे येणाऱ्या अशा लोकडाऊन, साथीचे आजार, कारागीर आजारी पडला तर पहिले तीन दिवस पगार, या सारख्या कामासाठी वापरण्यात येईल.
११. सलूनमध्ये पूर्व अपॉइंटमेंट घेऊन मगच येण्याची व्यवस्था राबवण्यासाठी तंत्रज्ञनाचा वापर करण्यात येईल, ज्यामुळे एका वेळी ४ पेक्षा अधिक ग्राहक दुकानात जमणार नाहीत. सुरवातीला मोबाईल चा वापर करून अपॉइंटमेंट देण्यात येईल. त्यानंतर पूर्व बुकिंग करून पूर्व पेमेंट करूनच ग्राहकाला प्रवेश देण्यात येईल.
१२. घरी जाऊन सेवा देणे बंद करण्यात येईल किंवा परिस्थितीनुसार ठरवण्यात येईल. बंधनकारक नसेल.
डाॅ संदीप कडवे