Month: May 2020

आधुनिक युगातील एक नविन स्किल. भाग १-nabhikdaily टीम

आजच्या या युगात ऑनलाईन गेम्स खेळायला शिकलो तर आपल्या पाल्या ला रागवू नका कारण येत्या काळात हा एक नवीन स्किल म्हणून प्रचलित होईल.

ऑनलाईन गेम्स हे कसे खेळतात ? त्या साठी काय ज्ञान असणं आवश्यक आहे हे सगळे एक रिसर्च करू आम्ही एक YouTube channel channel’s link share kartoy.
तर मग पहा सविस्तर दिलेल्या लिंक वर.

https://youtu.be/kfPoRdolP-A

Subscribe this channel for more updates

✍️नाभिकांनो,
एक व्हा किंवा नष्ट व्हा !!!!
निट वाचा. संपूर्ण वाचा.
🌹🌹अजित खंडागळे 9823105012.


नमस्कार माझ्या समाजबांधवांनो,
कोरोनामुळे आपल्याकडे विचार करायला वेळ आहे.आपण काय विचार करतोय ??? आपलं नेमकं काय चाललंय ? आपण कुठे आहोत ? आपल्या काही मागण्या आहेत का ?? शासनाच्या उपेक्षेची धग आपल्याला जाणवली नाही का?
थोडा विचार करा.नेमका विचार करा.
👉1) गावागावांतून अल्पसंख्याक असणारा नाभिक समाज आजपर्यंत शिक्षण, आरोग्य, आणि अन्य शासकीय सुविधांपासून वंचित आहे.अपुऱ्या संघटन कौशल्यामुळे आपल्याला आपल्या मागण्या शासकीय स्तरांपर्यंत रेटता येत नाहीत.शासरदरबारी आपल्या किती आणि कोणत्या मागण्या आहेत? आजवर किती मागण्या मान्य झाल्या ?तुम्ही यावर समाधानी आहात का ?? आपण किती योजनांचा लाभ घेतला ?? नाभिक समाजाला सार्वत्रिक स्तरावर न्याय मिळेल आणि हा समाज विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने जाईल असा एखादा स्वतंत्र निर्णय स्वतंत्र भारतात घेतल्याचे तुम्हांला माहित आहे काय ??
👉 2) आपण शासनाला काय मागितले आणि शासनाने आपल्याला काय दिले ,हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे.
👉 3) म्हणून समाजबांधवांनो जागे व्हा.समाजप्रवाहातून बाहेर पडू नका.समाजाच्या विकासाचा प्रयत्न करा.
हेवेदावे,भांडणतंटा,मानपान, हारतुरे, खुर्ची-पदे यासाठी नाराज निराश होवू नका.हाव धरू नका.अट्टाहास करू नका.स्वतःच्या जातीची लाज वाटत असेल तर यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही.समाजाचे प्रबोधन न करणे यासारखे पाप नाही.जातीसाठी माती खाल्ली पाहिजे. जातीसाठी वेळ दिला पाहिजे.
👉 4) स्वतःच्या जातीला दोष देत स्वतःला शहाणे समजणारे समाजापासून अलिप्त असणारे लोक समाजाचे फार मोठे नुकसान करत आहेत.समाजाचा बुद्धीभेद करून जगणारे नेते फार मोठे पाप करत आहेत.यासाठी कणखर, अभ्यासु,जागरुक,निर्व्यसनी, महत्त्वकांक्षी आणि समाजावर भरपूर प्रेम करणारे आणि समाजाची व्यथा समजणारे नेतृत्व निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.नेतृत्वहिन समाजाला सामाजिक प्रवाहात काडीचीही किंमत नसते.असा समाज काळाच्या प्रवाहात बाजूलाच पडतो.ज्याला नेता नाही ,असा समाज नाश पावतो.म्हणूनच स्वत:ची किंमत ओळखा.दिलदार होवून समाजाचे नेतृत्व करा.स्वर्गीय लोकनेते,समाजभूषण हणमंतराव साळुंखे तात्या यांच्या संघटन विचाराने प्रेरित होवून समाजासाठी अहोरात्र काम करा.आपल्या समस्या, अडचणी जाणून घ्या.प्रगतीची नवनवीन शिखरे काबीज करा.
👉 5) आपण गाफील राहिल्याचे परिणाम कदाचित आपल्याला कळणार नाहीत,पण पुढील पिढीला त्याचे जबर परिणाम मोजावे लागतील.
👉 6) ही निर्वाणीची वेळ आली आहे.जग एवढे झपाट्याने बदलणार आहे की विचाराने झोपलेला समाज संपल्याशिवाय राहणार नाही.बळी तो कान पिळी या न्यायाने आता आर्थिक, सामाजिक, मानसिक, बौद्धिक बळ प्राप्त केल्याशिवाय यापुढे जगात सन्मानाने जगताच येणार नाही.दुर्बळांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.
👉 7)पुढील पिढीचे भविष्य भस्मसात झालेले पाहण्याचे धैर्य आपल्याअंगी आहे काय ??? नक्कीच नाही.
👉 8)माझ्या दुकानात फार पैसा मिळतो,मी नोकरी करतो ,मला कोणाची गरज नाही,असे जर आपले विचार असतील तर आणि नाभिक समाजाच्या चळवळीबरोबर राहणार नसाल तर येणाऱ्या पिढ्यांचे नुकसानाची जबाबदारी नियतीने आपल्याच माथ्यावर टाकलेली असेल.
👉 9)कोणत्या गोष्टींचा वारसा आपण पुढच्या पिढीला देणार आहोत???आजचे स्पर्धेचे युग पुढील काळात महाभयंकर होणार आहे !!! काळाची पाऊले ओळखून निर्णय घेतले पाहिजेत.प्रबोधनाची कास धरली पाहिजे.किंवा ….नष्ट झाले पाहिजे.
👉 10)मला आशा वाटते ते माझ्या सळसळत्या युवक मित्रांकडून !!! तुमच्यातूनच पोलादी मनगटाचे युवक तयार व्हावेत आणि आपल्यातूनच नाभिक समाजाला योग्य दिशा आणि नेतृत्व देणारे तेजस्वी सूर्य निर्माण होतील ,हीच अपेक्षा.🙏🙏🙏🙏🙏


🌹🌹🌹अजित खंडागळे :- 9823105012.

नाभिक व्यवसायाची नोंदणी करताना काय दक्षता घ्यावी आणि त्या विषयी सविस्तर माहिती — अजित खंडागळे.9823 105012.

प्रत्येक मुद्दा निटवाचा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्स मध्ये विचारावे.

नमस्कार समाज बांधवांनो..
कोरोनाचे हे दिवस नाभिकांना बरेच काही शिकवून जात आहेत.काही चांगलं आहे.काही वाईट आहे.पण बहुतांश ठिकाणी आता आपली मतं एक येत आहेत,ही एक चांगली गोष्ट आहे.
त्यापैकी आपण आपला व्यवसाय नोंदणीकृत करून घेतला पाहिजे,या गोष्टीवर आपण आलो आहोत.त्यासंबंधी थोडी माहिती देत आहे.

१)आपला व्यवसाय जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी करा.
कोणत्याही सायबर कॅफेतून हा व्यवसाय नोंदणी करता येतो.
२)यासाठी सायबरवाले 300 ते 500रूपये आकारतात.आपल्या मोबाईलवर सुद्धा हे काम होईल.
३)या व्यवसायाची नोंदणी सेवा उद्योग म्हणून केली जाते.
४)नोंदणी करताना आपले आधार कार्ड,पॅनकार्ड,राष्ट्रीयकृत बँकेचेच अकाउंट नंबर,आयएफ
एससी कोड ही माहिती द्यावी लागते.
५)जो मो.नं.तुम्ही सतत वापरता,ज्यावर मेसेज आल्यावर तुम्हाला लवकर कळेल असाच मो.नं.त्यावर जोडावा.ईमेल वापरत असल्यास तशी नोंद करावी.
६)उद्योग आधार ची नोंदणी वारंवार करावी लागत नाही.एकदाच करावी.Renew वगैरे करावे लागत नाही.
७)एखाद्या माणसाने आणखी एखादा नवीन उद्योग सुरू केला तर त्याची नवीन नोंद होते.मात्र उद्योग आधार नंबर तोच राहतो.
८)उद्योग आधारची नोंद करताना कामगार संख्या,भांडवल (रूपयांत) अशा गोष्टींची नोंद होत असते.तेव्हा ती माहिती व्यवस्थित भरावी.पुढील काळात जिल्हा उद्योग केंद्रातून /बँकेतून योग्य प्रमाणात कर्जे मिळवण्यासाठी उपयोग होतो.निदान ही भांडवल रक्कम पाच दहा लाख रूपये असावी.
९)उद्योग आधार सर्टिफिकेट लगेच मिळते.त्याची कलरप्रिंट काढून दुकानात दर्शनी भागात लावा.एक प्रिंट घरी जपून ठेवा.
१०)उद्योग आधार मिळाल्यानंतर शांत बसू नका.इथे तर फक्त थोडंसंच काम झालंय.


११)लवकरच शॉप ऍक्ट लायसेन्स काढा.तेही दुकानात लावा.
१२)आपल्या उद्योगातील रोजचा जमाखर्च लिहून ठेवा.त्या डायरीज जपून ठेवा.
१३) कॉस्मेटिक /इतर सर्व साहित्य विकत घेताना ओरिजिनल पावती घ्या.त्या पावत्या फाईल करुन जपून ठेवा.
विजबिल वा अन्य बिले इतरांच्या नावांवर येत असतील तर त्यासंबंधी योग्य मार्गदर्शन घ्या.
१४)उद्योग आधार मिळाल्यानंतर बँकेत सेव्हिंग अकाऊंट चे करंट अकाऊंट करा.त्यासाठी लागणारी अतिरिक्त डिफॉसिट रक्कम भरा.त्याबरोबर या खात्यावर बचत आणि उलाढाल करा.दैनिक बचत सुद्धा याच खात्यावर करा.तीन महिने/सहा महिने/वर्ष अशी स्टेटमेंट काढा.(स्टेटमेंट काढण्यासाठी पानानुसार पैसे आकारले जातात.)जितकी अकाऊंट तितकी स्टेटमेंट द्यावीच लागतात.त्यामुळे बँक खाती कमी असावीत.
१५)आपल्या जवळचा एक चांगला ,हुशार, सी.ए.(C.A)शोधून त्याकडून इन्कम टॅक्स संबंधी फाईल बनवा.दरवर्षी योग्य तो टॅक्स भरा.त्यानंतर टॅक्स रिटर्न फाईल वगैरे गोष्टींची माहिती करून घ्या.

१६)काही लोकांना हे कटकटीचे वाटू शकते.परंतु हे फार अवघड नाही.मात्र बँकेचे कर्ज,उद्योग केंद्राचे कर्ज,सरकारच्या सवलती ,सबसिडी आदि गोष्टींसाठी उपयोगी ठरेल.
अजित खंडागळे.
9823 105012.

माझ्या नाभिक व्यावसायिक बांधवांनो,कृपया सलून व्यवसाय सुरु करताना खाली दिलेल्या गोष्टींचा समजून आणि प्रामाणिकपने अमलात आणणे.

1) आलेल्या ग्राहकाचे नांव आणि मोबाईल नंबर लिहून घेणे (ग्राहक हिष्ट्री अत्यावश्यक)
2) कटिंग झाल्यावर साईडला झिरो मशीन वापरणे,ग्राहकांना ब्लेडने पाहिजे असलेस ब्लेड वापरणे.
3) चेहऱ्यावर पाणी , फेशवाँश , क्लिंझींग, स्क्रब इ.न वापरणे.
4) दुकानात 5 ते 6 फुटावर एकच ग्राहक असावं, त्याचे काम झाल्याशिवाय दुसरा ग्राहक आत घेऊ नये.
5) आपल्या चेहऱ्यावर ,केसाला मास्क , हातात हॅन्डग्लोव्ह्ज असावे.
6) ग्राहक आत येताना त्याच्या हातासह पूर्ण अंगावर फवा-याने सॅनेटायझर फवारणी करूनच आत घ्यावे.
7) ग्राहकाचे काम पूर्ण झाल्यावर स्वतः चे हात, खुर्ची आणि कामाची औजारे प्रत्येक वेळा सॅनेटायझर ने स्वच्छ करायला विसरू नये.
8) येणारा ग्राहक ताप, खोकला,शिंक असा आजारी किंवा अनोळखी असेल तर त्याला तसेच परत पाठवा.
9) ग्राहकाला स्वतः चे टॉवेल (नॅपकिन) आणायाला सांगा तो नसेल आणत तर विक्रीसाठी ठेवा.
10) कामानंतर जेवायला जाताना अंगावरील सर्व किट/ कपडे गरम पाण्यात धुण्यासाठी बाहेरच काढून स्वतः अंघोळ करूनच परिवारात जा. पुन्हा दुकानात जाताना नवीन कपडे/ किट घालून जावे.
11) स्वतः च्या आणि परिवारातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी अगोदर घ्या. “बचेंगे तो और भी लढेंगे”
12) कटिंग करणा-या ग्राहकास मास्क अत्यावश्यक आहे.
13) ग्राहकाकडून वाढीव सुरक्षा खर्चासह शिल्लक मोबदला घ्यावा(तसा बोर्डच दर्शनी भागात लावा), आणि तो घेताना त्यावर सुद्धा सॅनेटायझर ने फवारून घ्यावे.
14) बार- गुटखा-दारू आदी व्यसन करून आलेल्या ग्राहकास पार्ट पाठवा.
15)स्वतःचा मोबाईल सॅनेटायझर ने ओल्या केलेल्या कपड्याने स्वच्छ करूनच वापरा किंवा हेडफोनचा उपयोग करावा.
16) ग्राहकांच्या बगल आणि नाकातील केस काढू/कापू नका.
17) दररोज कापलेल्या केसांची सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावा.
18)ग्राहक संख्या कमी झाली तरी चालेल पण स्पष्ट बोला, वेळ पाळा, सुरक्षित राहा.
19) व्हॉटसअप ऍप चा उपयोग करू शकता अडवन्स बुकिंग साठी त्या साठी बिझनेस व्हॉटसअप ऍप कसे वापरायचे ह्याचा एक व्हिडिओ पोस्ट करतोय.. कृपया पाहा आणि आपल्या संपर्कात असणारे आपले नाभिक बांधव पर्यन्त पोचवा..

मित्रानो, तुम्ही काळजी घेऊन स्टॅंडर्ड व्यवसाय केला तर तुमचे महत्व आणि परिवाराचे आरोग्य अबाधित राहील.

Regards Nambhik Soyrik Team

श्री जय संत सेना महाराज

नाभिक वधू वर जोडी
NabhikSoyrik आता व्हॉटसअप वर उपलब्ध.
आता मुला मुलींच्या च्या लग्नाची चिंता सोडा फक्त २९९/- मध्ये ३ महिने

फक्त २ मिनिटे वेळ काढून नक्की वाचा आणि आपले जवळचे नातेवाईक,मित्र यांच्यापर्यंत नक्की share करा…

नमस्कार 🙏🙏 नाभिक सोयरिक वधूवर जोडी मध्ये आम्ही आपले स्वागत करीत आहोत.आपण दिलेल्या उदंड प्रतिसाबद्दल नाभिक सोयरिक वधूवर जोडी टीमकडून धन्यवाद !! आज समाजामध्ये असंख्य मुलामुलींचे लग्न जुळत नाहीत..कारणे खूप आहेत..वधूवर चे वय निघून जाताना दिसत आहे पण अपेक्षे साठी लग्न जुळत नाही किंबहुना अपेक्षा मध्ये ज्यावेळेस मिळतील त्यावेळेसच लग्न करायचे असे म्हणून समाजातील वधू किंवा वर हे थांबले आहेत..कोणाला मोठमोठ्या matrimonial website मध्ये 8 ते 10 हजार रु.देऊन सुद्धा अपेक्षापूर्ती स्थळ मिळत नाही..परंतु आमच्याकडे आम्ही फक्त रु. 299 मध्ये 3 महिने नाभिक सोयरिक वधूवर जोडी whats app chya माध्यमातून तुमचा whats app No.Join करतो.म्हणजे स्थळे Direct तुमच्या मोबाईल वर येतात.whats app chya माध्यमातून दररोज संपूर्ण महाराष्ट्र मधील नाभिक समाजातील बायोडाटा आम्ही सेंड करतो. तुम्ही तुमच्या बायोडाटा ला कोणते स्थळ match होते. ते तुम्ही स्वत:हून चेक करायचे आणि जे स्थळ match होईल त्यांना तुम्ही call करू शकता.कारण बायोडाटा मध्ये आम्ही त्यांचा मोबाईल नंबर दिलेला असतो. किती सोपे झाले आता घरबसल्या स्थळ शोधणे
तर मग लवकरात लवकर आपल्या जीवनातील जीवनसाथी नाभिक सोयरिक वधूवर जोडी मधूनच शोधा..
संपर्क- पवन धामोरे


व्हॉट्सँप app No.9011270787 धन्यवाद

https://imjo.in/Kw2DVv

5 मे
“लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे”- श्री पुंडलिक कुबडे ,उमरखेड

वीर शिवा काशिद

5 मे
“लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे”
सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्या साठी जेव्हा शिवाजी काशीद तयार होत होते तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात
पाणी आलं. तेव्हा शिवाजी काशीद यांनी महाराजांना विचारलं,
“महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू ?? ?”
तेव्हा महाराज म्हणाले
“शिवा तू हा पोशाख परीधान
केला आहेस.
याचं
बक्षीस काय मिळणार माहीत आहे तुला?”
शिवा काशिद म्हणाले,
“होय राजे मला माहीत आहे, शत्रूच्या वेढ्यात गेल्यावर शत्रू मला खतम करणार आहे, पण
शत्रू मला मारताना शिवा काशिद म्हणून मला मारणार नाही, तर शिवाजी महाराज म्हणून मला मरायची संधी मिळत्येय राजे.
ही संधी सोडीन मी ??? “
सात जन्माची पुण्याई म्हणून शिवाजी महाराज म्हणून_मरतोय ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय.🙏🚩
किती सामर्थ्य आणि त्याग
होता शिवाजी काशिद यांच्या बोलण्यात….
एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते. शिवाजीराजें साठी मी हजार वेळा मरायला तयार आहे, शिवाजीराजे कोणाला सापडणार नाहीत असे म्हणत आपल्या प्राणाची आहुती देणा-या नाभिकरत्न नरवीर शिवरक्षक शिवाजी काशीद यांचा आज जयंती निमित्य . वीर शिवाजी काशिद यांना मानाचा मुजरा….. विनम्र अभिवादन !

जिल्हा कार्याअध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा यवतमाळ.–श्री पुंडलिक कुबडे ,उमरखेड.