महाराष्ट्र उत्कृष्ट नाभिक वक्ता २०२०

महाराष्ट्र उत्कृष्ट नाभिक वक्ता २०२०

Lockdown च्या काळात महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवाना आपले विचार मांडण्यासाठी एक हक्काच व्यासपीठ नाभिक समाज ,चंद्रपुर च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विषय : कोरोनाच्या लढाईत माणूसकीची‌ कसोटी

#पुरस्कार :#
प्रथम ‌‌ ३०००/- रुपये
द्वितीय २०००/- रुपये
तृतीय‌ १०००/- रुपये

आयोजित स्पर्धेत महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा .

#प्रवेश निशुल्क #
नोंदणी दि. १ जून ते ५ जून २०२०.

संपर्क :
श्री. सुशांत नक्षिणे
📱9371961854

श्री. संदेश चल्लीरवार
📱8421010003

टिप – ही माहिती कृपया आपल्या माध्यमातून तुमच्या संपर्कात असलेल्या नाभिक समाज बांधवाना पाठवा.🙏🏻🙏🏻🙏🏻

आधुनिक युगातील एक नविन स्किल. भाग १-nabhikdaily टीम

आजच्या या युगात ऑनलाईन गेम्स खेळायला शिकलो तर आपल्या पाल्या ला रागवू नका कारण येत्या काळात हा एक नवीन स्किल म्हणून प्रचलित होईल.

ऑनलाईन गेम्स हे कसे खेळतात ? त्या साठी काय ज्ञान असणं आवश्यक आहे हे सगळे एक रिसर्च करू आम्ही एक YouTube channel channel’s link share kartoy.
तर मग पहा सविस्तर दिलेल्या लिंक वर.

https://youtu.be/kfPoRdolP-A

Subscribe this channel for more updates

✍️नाभिकांनो,
एक व्हा किंवा नष्ट व्हा !!!!
निट वाचा. संपूर्ण वाचा.
🌹🌹अजित खंडागळे 9823105012.


नमस्कार माझ्या समाजबांधवांनो,
कोरोनामुळे आपल्याकडे विचार करायला वेळ आहे.आपण काय विचार करतोय ??? आपलं नेमकं काय चाललंय ? आपण कुठे आहोत ? आपल्या काही मागण्या आहेत का ?? शासनाच्या उपेक्षेची धग आपल्याला जाणवली नाही का?
थोडा विचार करा.नेमका विचार करा.
👉1) गावागावांतून अल्पसंख्याक असणारा नाभिक समाज आजपर्यंत शिक्षण, आरोग्य, आणि अन्य शासकीय सुविधांपासून वंचित आहे.अपुऱ्या संघटन कौशल्यामुळे आपल्याला आपल्या मागण्या शासकीय स्तरांपर्यंत रेटता येत नाहीत.शासरदरबारी आपल्या किती आणि कोणत्या मागण्या आहेत? आजवर किती मागण्या मान्य झाल्या ?तुम्ही यावर समाधानी आहात का ?? आपण किती योजनांचा लाभ घेतला ?? नाभिक समाजाला सार्वत्रिक स्तरावर न्याय मिळेल आणि हा समाज विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने जाईल असा एखादा स्वतंत्र निर्णय स्वतंत्र भारतात घेतल्याचे तुम्हांला माहित आहे काय ??
👉 2) आपण शासनाला काय मागितले आणि शासनाने आपल्याला काय दिले ,हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे.
👉 3) म्हणून समाजबांधवांनो जागे व्हा.समाजप्रवाहातून बाहेर पडू नका.समाजाच्या विकासाचा प्रयत्न करा.
हेवेदावे,भांडणतंटा,मानपान, हारतुरे, खुर्ची-पदे यासाठी नाराज निराश होवू नका.हाव धरू नका.अट्टाहास करू नका.स्वतःच्या जातीची लाज वाटत असेल तर यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही.समाजाचे प्रबोधन न करणे यासारखे पाप नाही.जातीसाठी माती खाल्ली पाहिजे. जातीसाठी वेळ दिला पाहिजे.
👉 4) स्वतःच्या जातीला दोष देत स्वतःला शहाणे समजणारे समाजापासून अलिप्त असणारे लोक समाजाचे फार मोठे नुकसान करत आहेत.समाजाचा बुद्धीभेद करून जगणारे नेते फार मोठे पाप करत आहेत.यासाठी कणखर, अभ्यासु,जागरुक,निर्व्यसनी, महत्त्वकांक्षी आणि समाजावर भरपूर प्रेम करणारे आणि समाजाची व्यथा समजणारे नेतृत्व निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.नेतृत्वहिन समाजाला सामाजिक प्रवाहात काडीचीही किंमत नसते.असा समाज काळाच्या प्रवाहात बाजूलाच पडतो.ज्याला नेता नाही ,असा समाज नाश पावतो.म्हणूनच स्वत:ची किंमत ओळखा.दिलदार होवून समाजाचे नेतृत्व करा.स्वर्गीय लोकनेते,समाजभूषण हणमंतराव साळुंखे तात्या यांच्या संघटन विचाराने प्रेरित होवून समाजासाठी अहोरात्र काम करा.आपल्या समस्या, अडचणी जाणून घ्या.प्रगतीची नवनवीन शिखरे काबीज करा.
👉 5) आपण गाफील राहिल्याचे परिणाम कदाचित आपल्याला कळणार नाहीत,पण पुढील पिढीला त्याचे जबर परिणाम मोजावे लागतील.
👉 6) ही निर्वाणीची वेळ आली आहे.जग एवढे झपाट्याने बदलणार आहे की विचाराने झोपलेला समाज संपल्याशिवाय राहणार नाही.बळी तो कान पिळी या न्यायाने आता आर्थिक, सामाजिक, मानसिक, बौद्धिक बळ प्राप्त केल्याशिवाय यापुढे जगात सन्मानाने जगताच येणार नाही.दुर्बळांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.
👉 7)पुढील पिढीचे भविष्य भस्मसात झालेले पाहण्याचे धैर्य आपल्याअंगी आहे काय ??? नक्कीच नाही.
👉 8)माझ्या दुकानात फार पैसा मिळतो,मी नोकरी करतो ,मला कोणाची गरज नाही,असे जर आपले विचार असतील तर आणि नाभिक समाजाच्या चळवळीबरोबर राहणार नसाल तर येणाऱ्या पिढ्यांचे नुकसानाची जबाबदारी नियतीने आपल्याच माथ्यावर टाकलेली असेल.
👉 9)कोणत्या गोष्टींचा वारसा आपण पुढच्या पिढीला देणार आहोत???आजचे स्पर्धेचे युग पुढील काळात महाभयंकर होणार आहे !!! काळाची पाऊले ओळखून निर्णय घेतले पाहिजेत.प्रबोधनाची कास धरली पाहिजे.किंवा ….नष्ट झाले पाहिजे.
👉 10)मला आशा वाटते ते माझ्या सळसळत्या युवक मित्रांकडून !!! तुमच्यातूनच पोलादी मनगटाचे युवक तयार व्हावेत आणि आपल्यातूनच नाभिक समाजाला योग्य दिशा आणि नेतृत्व देणारे तेजस्वी सूर्य निर्माण होतील ,हीच अपेक्षा.🙏🙏🙏🙏🙏


🌹🌹🌹अजित खंडागळे :- 9823105012.

नाभिक व्यवसायाची नोंदणी करताना काय दक्षता घ्यावी आणि त्या विषयी सविस्तर माहिती — अजित खंडागळे.9823 105012.

प्रत्येक मुद्दा निटवाचा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्स मध्ये विचारावे.

नमस्कार समाज बांधवांनो..
कोरोनाचे हे दिवस नाभिकांना बरेच काही शिकवून जात आहेत.काही चांगलं आहे.काही वाईट आहे.पण बहुतांश ठिकाणी आता आपली मतं एक येत आहेत,ही एक चांगली गोष्ट आहे.
त्यापैकी आपण आपला व्यवसाय नोंदणीकृत करून घेतला पाहिजे,या गोष्टीवर आपण आलो आहोत.त्यासंबंधी थोडी माहिती देत आहे.

१)आपला व्यवसाय जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी करा.
कोणत्याही सायबर कॅफेतून हा व्यवसाय नोंदणी करता येतो.
२)यासाठी सायबरवाले 300 ते 500रूपये आकारतात.आपल्या मोबाईलवर सुद्धा हे काम होईल.
३)या व्यवसायाची नोंदणी सेवा उद्योग म्हणून केली जाते.
४)नोंदणी करताना आपले आधार कार्ड,पॅनकार्ड,राष्ट्रीयकृत बँकेचेच अकाउंट नंबर,आयएफ
एससी कोड ही माहिती द्यावी लागते.
५)जो मो.नं.तुम्ही सतत वापरता,ज्यावर मेसेज आल्यावर तुम्हाला लवकर कळेल असाच मो.नं.त्यावर जोडावा.ईमेल वापरत असल्यास तशी नोंद करावी.
६)उद्योग आधार ची नोंदणी वारंवार करावी लागत नाही.एकदाच करावी.Renew वगैरे करावे लागत नाही.
७)एखाद्या माणसाने आणखी एखादा नवीन उद्योग सुरू केला तर त्याची नवीन नोंद होते.मात्र उद्योग आधार नंबर तोच राहतो.
८)उद्योग आधारची नोंद करताना कामगार संख्या,भांडवल (रूपयांत) अशा गोष्टींची नोंद होत असते.तेव्हा ती माहिती व्यवस्थित भरावी.पुढील काळात जिल्हा उद्योग केंद्रातून /बँकेतून योग्य प्रमाणात कर्जे मिळवण्यासाठी उपयोग होतो.निदान ही भांडवल रक्कम पाच दहा लाख रूपये असावी.
९)उद्योग आधार सर्टिफिकेट लगेच मिळते.त्याची कलरप्रिंट काढून दुकानात दर्शनी भागात लावा.एक प्रिंट घरी जपून ठेवा.
१०)उद्योग आधार मिळाल्यानंतर शांत बसू नका.इथे तर फक्त थोडंसंच काम झालंय.


११)लवकरच शॉप ऍक्ट लायसेन्स काढा.तेही दुकानात लावा.
१२)आपल्या उद्योगातील रोजचा जमाखर्च लिहून ठेवा.त्या डायरीज जपून ठेवा.
१३) कॉस्मेटिक /इतर सर्व साहित्य विकत घेताना ओरिजिनल पावती घ्या.त्या पावत्या फाईल करुन जपून ठेवा.
विजबिल वा अन्य बिले इतरांच्या नावांवर येत असतील तर त्यासंबंधी योग्य मार्गदर्शन घ्या.
१४)उद्योग आधार मिळाल्यानंतर बँकेत सेव्हिंग अकाऊंट चे करंट अकाऊंट करा.त्यासाठी लागणारी अतिरिक्त डिफॉसिट रक्कम भरा.त्याबरोबर या खात्यावर बचत आणि उलाढाल करा.दैनिक बचत सुद्धा याच खात्यावर करा.तीन महिने/सहा महिने/वर्ष अशी स्टेटमेंट काढा.(स्टेटमेंट काढण्यासाठी पानानुसार पैसे आकारले जातात.)जितकी अकाऊंट तितकी स्टेटमेंट द्यावीच लागतात.त्यामुळे बँक खाती कमी असावीत.
१५)आपल्या जवळचा एक चांगला ,हुशार, सी.ए.(C.A)शोधून त्याकडून इन्कम टॅक्स संबंधी फाईल बनवा.दरवर्षी योग्य तो टॅक्स भरा.त्यानंतर टॅक्स रिटर्न फाईल वगैरे गोष्टींची माहिती करून घ्या.

१६)काही लोकांना हे कटकटीचे वाटू शकते.परंतु हे फार अवघड नाही.मात्र बँकेचे कर्ज,उद्योग केंद्राचे कर्ज,सरकारच्या सवलती ,सबसिडी आदि गोष्टींसाठी उपयोगी ठरेल.
अजित खंडागळे.
9823 105012.

माझ्या नाभिक व्यावसायिक बांधवांनो,कृपया सलून व्यवसाय सुरु करताना खाली दिलेल्या गोष्टींचा समजून आणि प्रामाणिकपने अमलात आणणे.

1) आलेल्या ग्राहकाचे नांव आणि मोबाईल नंबर लिहून घेणे (ग्राहक हिष्ट्री अत्यावश्यक)
2) कटिंग झाल्यावर साईडला झिरो मशीन वापरणे,ग्राहकांना ब्लेडने पाहिजे असलेस ब्लेड वापरणे.
3) चेहऱ्यावर पाणी , फेशवाँश , क्लिंझींग, स्क्रब इ.न वापरणे.
4) दुकानात 5 ते 6 फुटावर एकच ग्राहक असावं, त्याचे काम झाल्याशिवाय दुसरा ग्राहक आत घेऊ नये.
5) आपल्या चेहऱ्यावर ,केसाला मास्क , हातात हॅन्डग्लोव्ह्ज असावे.
6) ग्राहक आत येताना त्याच्या हातासह पूर्ण अंगावर फवा-याने सॅनेटायझर फवारणी करूनच आत घ्यावे.
7) ग्राहकाचे काम पूर्ण झाल्यावर स्वतः चे हात, खुर्ची आणि कामाची औजारे प्रत्येक वेळा सॅनेटायझर ने स्वच्छ करायला विसरू नये.
8) येणारा ग्राहक ताप, खोकला,शिंक असा आजारी किंवा अनोळखी असेल तर त्याला तसेच परत पाठवा.
9) ग्राहकाला स्वतः चे टॉवेल (नॅपकिन) आणायाला सांगा तो नसेल आणत तर विक्रीसाठी ठेवा.
10) कामानंतर जेवायला जाताना अंगावरील सर्व किट/ कपडे गरम पाण्यात धुण्यासाठी बाहेरच काढून स्वतः अंघोळ करूनच परिवारात जा. पुन्हा दुकानात जाताना नवीन कपडे/ किट घालून जावे.
11) स्वतः च्या आणि परिवारातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी अगोदर घ्या. “बचेंगे तो और भी लढेंगे”
12) कटिंग करणा-या ग्राहकास मास्क अत्यावश्यक आहे.
13) ग्राहकाकडून वाढीव सुरक्षा खर्चासह शिल्लक मोबदला घ्यावा(तसा बोर्डच दर्शनी भागात लावा), आणि तो घेताना त्यावर सुद्धा सॅनेटायझर ने फवारून घ्यावे.
14) बार- गुटखा-दारू आदी व्यसन करून आलेल्या ग्राहकास पार्ट पाठवा.
15)स्वतःचा मोबाईल सॅनेटायझर ने ओल्या केलेल्या कपड्याने स्वच्छ करूनच वापरा किंवा हेडफोनचा उपयोग करावा.
16) ग्राहकांच्या बगल आणि नाकातील केस काढू/कापू नका.
17) दररोज कापलेल्या केसांची सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावा.
18)ग्राहक संख्या कमी झाली तरी चालेल पण स्पष्ट बोला, वेळ पाळा, सुरक्षित राहा.
19) व्हॉटसअप ऍप चा उपयोग करू शकता अडवन्स बुकिंग साठी त्या साठी बिझनेस व्हॉटसअप ऍप कसे वापरायचे ह्याचा एक व्हिडिओ पोस्ट करतोय.. कृपया पाहा आणि आपल्या संपर्कात असणारे आपले नाभिक बांधव पर्यन्त पोचवा..

मित्रानो, तुम्ही काळजी घेऊन स्टॅंडर्ड व्यवसाय केला तर तुमचे महत्व आणि परिवाराचे आरोग्य अबाधित राहील.

Regards Nambhik Soyrik Team

श्री जय संत सेना महाराज

नाभिक वधू वर जोडी
NabhikSoyrik आता व्हॉटसअप वर उपलब्ध.
आता मुला मुलींच्या च्या लग्नाची चिंता सोडा फक्त २९९/- मध्ये ३ महिने

फक्त २ मिनिटे वेळ काढून नक्की वाचा आणि आपले जवळचे नातेवाईक,मित्र यांच्यापर्यंत नक्की share करा…

नमस्कार 🙏🙏 नाभिक सोयरिक वधूवर जोडी मध्ये आम्ही आपले स्वागत करीत आहोत.आपण दिलेल्या उदंड प्रतिसाबद्दल नाभिक सोयरिक वधूवर जोडी टीमकडून धन्यवाद !! आज समाजामध्ये असंख्य मुलामुलींचे लग्न जुळत नाहीत..कारणे खूप आहेत..वधूवर चे वय निघून जाताना दिसत आहे पण अपेक्षे साठी लग्न जुळत नाही किंबहुना अपेक्षा मध्ये ज्यावेळेस मिळतील त्यावेळेसच लग्न करायचे असे म्हणून समाजातील वधू किंवा वर हे थांबले आहेत..कोणाला मोठमोठ्या matrimonial website मध्ये 8 ते 10 हजार रु.देऊन सुद्धा अपेक्षापूर्ती स्थळ मिळत नाही..परंतु आमच्याकडे आम्ही फक्त रु. 299 मध्ये 3 महिने नाभिक सोयरिक वधूवर जोडी whats app chya माध्यमातून तुमचा whats app No.Join करतो.म्हणजे स्थळे Direct तुमच्या मोबाईल वर येतात.whats app chya माध्यमातून दररोज संपूर्ण महाराष्ट्र मधील नाभिक समाजातील बायोडाटा आम्ही सेंड करतो. तुम्ही तुमच्या बायोडाटा ला कोणते स्थळ match होते. ते तुम्ही स्वत:हून चेक करायचे आणि जे स्थळ match होईल त्यांना तुम्ही call करू शकता.कारण बायोडाटा मध्ये आम्ही त्यांचा मोबाईल नंबर दिलेला असतो. किती सोपे झाले आता घरबसल्या स्थळ शोधणे
तर मग लवकरात लवकर आपल्या जीवनातील जीवनसाथी नाभिक सोयरिक वधूवर जोडी मधूनच शोधा..
संपर्क- पवन धामोरे


व्हॉट्सँप app No.9011270787 धन्यवाद

https://imjo.in/Kw2DVv

5 मे
“लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे”- श्री पुंडलिक कुबडे ,उमरखेड

वीर शिवा काशिद

5 मे
“लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे”
सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्या साठी जेव्हा शिवाजी काशीद तयार होत होते तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात
पाणी आलं. तेव्हा शिवाजी काशीद यांनी महाराजांना विचारलं,
“महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू ?? ?”
तेव्हा महाराज म्हणाले
“शिवा तू हा पोशाख परीधान
केला आहेस.
याचं
बक्षीस काय मिळणार माहीत आहे तुला?”
शिवा काशिद म्हणाले,
“होय राजे मला माहीत आहे, शत्रूच्या वेढ्यात गेल्यावर शत्रू मला खतम करणार आहे, पण
शत्रू मला मारताना शिवा काशिद म्हणून मला मारणार नाही, तर शिवाजी महाराज म्हणून मला मरायची संधी मिळत्येय राजे.
ही संधी सोडीन मी ??? “
सात जन्माची पुण्याई म्हणून शिवाजी महाराज म्हणून_मरतोय ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय.🙏🚩
किती सामर्थ्य आणि त्याग
होता शिवाजी काशिद यांच्या बोलण्यात….
एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते. शिवाजीराजें साठी मी हजार वेळा मरायला तयार आहे, शिवाजीराजे कोणाला सापडणार नाहीत असे म्हणत आपल्या प्राणाची आहुती देणा-या नाभिकरत्न नरवीर शिवरक्षक शिवाजी काशीद यांचा आज जयंती निमित्य . वीर शिवाजी काशिद यांना मानाचा मुजरा….. विनम्र अभिवादन !

जिल्हा कार्याअध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा यवतमाळ.–श्री पुंडलिक कुबडे ,उमरखेड.

“असा” असेल कोरोना नंतर माझा नभिक समाज व व्यवसाय,तसेच पुढील असतील आर्थिक,सामाजिक आव्हाने–प्रविण मधुकरआप्पा डाहाके सिरसो, ताः मुर्तिजापूर

🙏 खुला परीसंवाद🙏

“असा” असेल कोरोना नंतर माझा नभिक समाज व व्यवसाय,तसेच पुढील असतील आर्थिक,सामाजिक आव्हाने

कोरोना मुळे जगभर हाहाकार माजला आहे, त्याची सर्वाधिक झळ तळहातावर पोट असलेल्या माझ्या समाजाला बसली आहे. कोरोना नंतरही प्रादुर्भाव होण्यचा सर्वाधिक धोका व्यवसाया मुळे माझ्या समाजाला राहनार आहे.आपला पारंपरिक व्यवसाय तर लाँकडाऊन नंतर नाईलाजाने सुरु होईल, पण आजाराचा धोका संभवतो. कोरोना नंतर फार विवंचनेत असेल माझा समाज बांधव,कुटुंबाचा ऊदरनिर्वाह,मुलाचे शिक्षण,लग्न,आरोग्य या विचाराने त्याला झोप लागनार नाही.पारंपरिक व्यवसाया व्यतिरिक्त ईतर फारसा आधार नसल्याने आर्थिकदृष्ट्या कुमकुवत होईल माझा समाज.समाजापुढील आर्थिक, सामाजिक आव्हाने पेलण्याकरीता,व त्यांना धिर देण्याकरता शहर,गाव-खेड्यात विखुरलेल्या, अत्यल्पसंख्य असलेल्या माझ्या समाजातील अनेक पोटजाती व त्यातील ऊद्योग,व्यापार,साहित्य, कला,क्रीडा, शैक्षणिक, राजकीय, शेतकरी ,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी,अशा नानाविध क्षेत्रातील नामवंतांनी एकत्र येऊन गरीब, शोषित समाज बाधंवाना एकसंघ करावे, व आपले आधिकाधीक योगदान समाजहित साधण्यासाठी द्यावे. अशा कठीण प्रसंगी आपल्याला समाजाच काही देण लागत हा ऊद्दात्त हेतू डोळ्यासमोर ठेवावा. आर्थिक बाबीचा विचार केला अहता घरी फारसी स्थावर मालमत्ता नाही, त्यामुळे बँक कर्ज सुद्धा देत नाही.त्यामुळे नवीन व्यवसाय, ऊद्योगामध्ये माझा समाज नाही.याकरिता माझ्यामते ईतर समाजाप्रमाने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांनी निस्वार्थ सेवाभावी वृत्ती ने समोर यावे. कला,क्रीडा, साहत्य,ऊद्योग, व्यपार,शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीयसेवा,कर्मचारी, समाजातील होतकरू तरुण,अभ्यासु,जेष्ठ मंडळी, यांच्या विविध सघंटना समीत्या स्थापन करुण, जर शासन दरबारी एक समाजाचा दबदबा निर्माण केला तर,सघंटनेमुळे समाजहित साधण्यास सोपे जाईल.समाजातिल आर्थिक, सामाजिक आव्हाने काही प्रमाणात मार्गी लागतील.आपल्याला अन्यायविरुद्ध लढण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी ऊभारावी लागेल,हे सर्व प्रश्न मार्गी लागल्याने अत्यल्पसंख्य समाजाला एक हक्काचे व्यासपीठ मीळेल. व समाज बाधंवामधील असुरक्षिततेची भावना,नैराश्य,आर्थिक आव्हाने दुर करण्यस मदत मीळेल. महाराष्ट्रतील संख्येने मोठ्या असलेल्या एका समाजाने आरक्षण मागणी करीता राज्यभर मोर्चे कढले,त्यांच्या नियोजनाची दखल देशाने घेतली.हे शक्य झाले केवळ समाज सघंटनेमुळे,छत्रपती शिवाजी महाराजांनी अजरामर ईतीहास घडविला मावळे "अल्पसंख्य"असुनही एकसंघ असल्याने! म्हणून आपनही एकसंघ संघटीत होउन आपल्या समाजापुढील आर्थिक, सामाजिक आव्हाने लिलया पेलू व समाजाला भय,भिती,गरीबीमुक्त करण्यासाठी खारीचा वाटा ऊचलावा,ही नम्र विनंती.धन्यवाद!

प्रविण मधुकरआप्पा डाहाके सिरसो, ताः मुर्तिजापूर, जिः अकोला, भ्रम.ः९०९६९८९६१०

कोरोना महामारीमुळे नाभिक समाजासमोरील आव्हाने? —श्री संत सेना हरी मंदिर ट्रस्ट (रजि) हुबळी.

सध्या कोरोना विषाणूं मुळे संबंध जगात महामारी पसरली असून त्यामुळे प्रगत देशात संसाधने असताना व लोकसंख्या कमी असून देखील त्याचा प्रसार थांबवता आला नाही. त्यामुळे आर्थिक सामाजिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारत देशयाला अपवाद नाही. कारण भारता ततुलनात्मक दृष्टीने आरोग्य विषयक संसाधने अपुरी आहेत व लोकसंख्या अफाट आहे. देशात सांस्कृतिक व धार्मिक वैविध्य टोकाच्या विरोधाभासाने भरलेले आहे त्यामुळे सरकारला एक विशिष्ट भूमिका घेऊन ती परिणामकारक पध्दतीने अंमलात आणून कोरोना साथीला आळा घालणे अवघड झाले आहे. लाकडाऊन व संचार बंदीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. आवश्यक सेवांतर्गत उद्योग देखील कमित कमी कामगारांच्या साहाय्याने चालू ठेवणे कोरोना संसर्गाच्या भितीमुळे व दळणवळणाची साधने (लोकल,बसेस, मेट्रो) बंद असल्याने अवघड होतं आहे. त्यामुळे औषधाचा व आरोग्य विषयक साधनांचा तुटवडा भासू लागला आहे. आयातीवर अवलंबून असणारे उद्योग कच्च्या माला अभावी बंद आहेत. या सर्व उद्योगांना लागणारा संघटित कामगार घरी बसला आहे. मग असंघटि तकामगारांचे हाल विचारावयास नको कारण संचार बंदी मुळे त्याची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. वैयक्तिक स्वच्छता सेवा देणाऱ्या नाभिक समाजाच्या संकटात आणखी भरपडली ती अनावश्यक व बदनामी कारक गैरसमजुती मुळे की सलूनमधे साधनांची व कपड्यांची (टावे लन्यापकिन ब्लेड वगैरे) स्वच्छता पाळली जात नाही त्यामुळे संसर्ग वाढल व कोरोनाची साथ आटोक्यात आणणें सरकारला अवघड जाईल म्हणून सुरुवातीला काही नाभिकांनी स्वताच दुकाने बंद ठेवलीत रनंतर सरकारी आदेशामुळे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. परिणामी इतर मजुराप्रमाणे छोटे सलून दुकानदार व मोठ्या दुकानात ब्यूटी पार्लर मधील कारागीर ज्याचे घरी रोजंदारीवर संध्याकाळी चूल पेटायची त्याला त्याच्या सधन बांधवांच्या मदतीवर तसेच सेवाभावी संस्थांच्या मदती वर अवलंबून राहावे लागत आहे. सरकारीमदत हीसर्वदूर खेड्यापाड्यात पोहचू शकतनाही कारण सर्व कामगारांची व कुटूंबाची नोंदणी झालेली नसते. त्यामुळे अशांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.

नाभिक कारागीर हा कुश लकामगार आहे. इतर कुशल कामगार निर्जिव व स्तूवर किंवा यंत्रावर आपले कौशल्य वापरून काम करतात,वस्तूंचे उत्पादन करतात किंवा इतर प्रकारच्या सेवा पुरवतात. परंतू नाभिक हा ग्राहकांना वैयक्तिक स्वच्छता देऊन सौंदर्य खुलवण्याचे काम करत असून देखील त्याच्याकडे बघण्याचा समाजाचा द्रुष्टीकोन चांगला नाही व त्याला मिळणारी वागणूक अपमानास्पद आहे. काळ बदलला आहे व त्यानुरुप स्वच्छतेबद्दलची जागरूकता ग्राहका इतकीच नाभिका मधेही आलेली आहे हे स्विकारावे लागेल. प्रत्येक ग्राहकांसाठी वेगळे ब्लेड, स्वच्छनपकिन‌, पांघरण्यासाठी झुळझुळीत नायलान किंवा रेशमी वस्त्रे वापरली जातात, सनिटायझर म्हणजे तुरटी व डेट्टाल प्रत्येक ग्राहकांसाठी न चुकता वापरले जाते. हा विषय चेष्टेचा नाही तर गंभीर आहे त्यामुळे सरसकट निराधार व बेछूट आरोप करणे नाभिक समाजावर अन्याय करण्यासार आहे
ह्या समाजाचा धंदा पूर्वापार चालत आलेला आहे. यांचे कौशल्य हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले आहे. त्यामधे विशेष कुशलता प्राप्त करण्याचा प्रयत्न नसायचा. पण आता दळणवळणाची साधने वाढली आहेत. साफ्टवेअर इंडस्ट्री झपाट्याने वाढली आहे. त्याचा परिणाम होऊन सलून व्यवसायात देखील आधुनिकी करण होऊ लागले. नवीन मशीन्स,नवी सौंदर्य प्रसाधने, नवीन टेक्नॉलॉजी वापरून, फिजिओथेरपी, स्किनकेअर, व्हिटामिनाइज्ड क्रिम शांपू विविध तेले वापरून खूप चांगले बदल सर्व सामान्य सलूनमधे देखील झाले आहेत. अर्थात घरोघरी जाऊन किंवा झाडाखाली रस्त्यावर बसून धंदा करणा- त्याकडून ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. वास्तविक हा समाज २००/३०० वर्षां पूर्वी अत्यंत पुढारलेला होता व शल्यचिकित्सक होता. त्यांच्या बोटांची लवचिकता बघून ब्रिटीश सरकार अत्यंत प्रभावित झा लेहोते व त्यांनी इंग्रजांना भारतात खास बोलावून अशा आचार्याकरवी ट्रेनिंग दिले होते जे नाभिक समाजाचे अध्वर्यू होते. कालांतराने म्हणजे प्रथम खानेसुमारीचे वेळी(१८८१) नाभिक समाजाचे वर्गीकरण मागास वर्गात जाणूनबुजून करण्यांत आले व हा समाज एकेकाळी पुढारलेला होता त्याचे कायद्याने खच्चीकरण करून सामाजिक उतरंडीत खाली आणल्याने या समाजा बद्दल हीन भावना निर्माण झाली ती आजतागायत!

या समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकावले तर असे लक्षात येईल की यांना अत्यंत सम्रृद्ध परंपरा लाभली आहे. प्रसिद्ध महापद्मनंद प्रथम चक्रवर्ती सम्राट, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, शिवकालीन शहीद जिवा महाले, सांडूवाघ, लालाजी वाघमारे, शहीद अडव्होकेट विठ्ठलराव भाई कोतवाल, माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा, बिहार चे माजी मुख्यमंत्री कै. कर्पूरी ठाकूर अशा महामानवांचा समावेश आहे तर अलीकडील काळातील फायरब्रैंड भाजपा नेत्या साध्वीऋतुंभरा, विद्यमान खासदार श्रीमती युक्ता मुखी अशांचा उल्लेख करता येईल. एकेकाळी नेतृत्व करण्याची क्षमता असणा-या समाजाने भागवत भक्त सेना महाराजांसारखे संत दिले ज्यांनी भागवत धर्माची पताका उत्तरेपर्यंत फडकवली व हिंदी, मराठी, मारवाडी, तसेच गुरूमुखीत अभंगरचना केली. इतकेच नव्हे तरत्यांच्या काही अभंगांचा समावेश शिखांच्या पवित्र ग्रंथात म्हणजे गुरूबाणी मध्ये केला आहे इतकी महानयोग्यता या संतांची आहे जे भीष्माचार्यांचे अवतार असल्याचा उल्लेख सापडतो. या समाजात संत नगाजी महाराजांचे स्थान मोठे आहे विशेषतःविदर्भात. अशी ऐतिहासिक, सामाजिक धार्मिक पार्श्र्वभूमी असलेल्या समाजाकडे सरकारचे दुर्लक्षहोत आहे कारण ३ टक्के असलेला ना निवडणूक जिंकून देऊ शकतो ना स्वबळावर निवडणूक जिंकून स्वताचे पुढारीपण स्थापू शकतो. एकीचा अभाव, गटातटांचा सुळसुळाट, अठरापगड उपजाती ज्यामधे रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. यापूर्वी अनेकांनी या समाजाच्या विविध घटकांना एकत्र आणून राष्ट्रीय व राज्यस्तरीय संघटना प्रयत्नपूर्वकबां धली होती. त्यात उल्लेखनीय नाव कै.ना.भु.संगमवारयांचे घेता येईल. ते अखिल भारतीय संघटन बांधण्यात यशस्वी झाले होते परंतुत्यांच्या अचानक निधनानंतर हे काम मंदावले. त्यांना कै.शंकरराव जगताप, माजी विधान सभा-सभापती महाराष्ट्र राज्ययां चे मार्गदर्शन व सहकार्य लाभले होते.त्यांच्या त्यागाला परिसीमा नाही. त्यांना मुंबई माथेरान येथील असंख्य कार्यकर्ते व समाजबांधवांचे सहकार्य लाभले होते. एकीकडे या समाजावर विशेषतःग्रामीण भागात अनेक प्रकारचे अत्याचार होताना दिसतात त्यांना न्याय

मिळत नाही. दुसरीकडे दुर्लक्ष होतेय त्यांच्या अस्मिता जपण्याबद्दल. का नाही मिळत मान्यता सेना महाराजांना राष्ट्रसंत
म्हणून? जीवा महाले यांचे स्मारक प्रतापगडावर का होऊ देत नाहीत? खरा इतिहास का शिकवला जात नाहीं? बांधवगड, पन्हाळगड,प्रतापगड,सिद्धगड ही आधुनिक तिर्थक्षेत्रे म्हणून या समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठी व नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी सरकार ने विकास करावा ही मागणी दुर्लक्षून चालणार नाही.

अनेक वर्षांची या समाजाची मागणी आहे शैक्षणिक सवलती मिळण्याची. मागास वर्गात घालण्याची व आरक्षणा ची. याकडे सतत कानाडोळा केला जातो. अलिकडे परीट धोबी समाजाला आरक्षण मिळाले पण नाभिक समाजाच्या हाती काही लागले नाही. याला कारण शिक्षणा चा अभाव, एकीचा अभाव, चांगल्या नेतृत्वाचा अभाव तसेच कारागिरामधील व्यसनाधीनता होय.समाजातील दुकानदार व नोकरदार यातील वाढती दरी हे यांच्या प्रगतीतील अडसर आहेत. सर्वसामान्यांना पगारवाढ पाहिजे, शेतकऱ्यांना मालाला चांगला भावमिळाला पाहिजे कारण रूपयांचे अवमूल्यन होऊन महागाई वाढली आहे पर्यायाने उत्पादन खर्च वाढला आहे,निसर्गाचे चक्र बदलत आहे त्याचा प्रतिकूल परिणाम कुठे कसा होत आहे अयाची कल्पना पण करवत नाही. या परिस्थितीत नाभिकाला लागणा-या वस्तूंच्या नुसत्या किमतीचे वाढल्या नसून कमीत कमी लागणा-या विविध वस्तूंची संख्या वाढली आहे त्यामुळे ते देत असलेल्या सेवांची किंमत वाढवणे हे अपरिहार्य आहे. हे समाजातील इतरांनी समजून घेतले पाहिजे. यामधे आता कोरोना मुळे आणखी काही गोष्टी कराव्या लागतील जसे सनीटायझर, मास्क, ग्लोव्हज वगैरे ज्यामुळे त्याचा ही सेवा देण्यासाठी खर्चवाढणार आहे. ग्राहकांना याचा भार उचलावा लागेल. न्हाव्याला एवढे पैसे कशाला द्यायचे किंवा कशाला लागतात अशी भूमिका वास्तवाशी फारकत घेतल्यासारखे होईल. समाजाच्या इतर सर्वसामान्य घटकांच्या गरजाप्रमाणेच नाभिक समाजाच्या ही गरजा आहेत स्वाभिमानाने जगण्यासाठी.त्याच्याउपजिविकेसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्य विषयक गरजांसाठी. अशा कठीण परिस्थितीत हा समाज जगवण्यासाठी सरकारवर दबाव आणून आर्थिक मदतमिळवण्या साठी अनेक संघटना आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण सरकारी मदत वेळेवर मिळणं दूरापास्त आहे. म्हणून अनेक सधन नाभिक बांधव व दुकानदार पुढे सरसावले आहेत व आपल्या बांधवांची उपासमार होऊ नये म्हणून अन्नधान्य,तेलसाखर चहा-पावडर, साबण,शिधा वाटत आहेत. काही दानशूर जेवणाची पाकिटे गरजूंना देत आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र नाभिक टायगर सेना, संत सेना सलून दुकानदार संघ सोलापूर अशा अनेक संघट ना सरकारने आर्थिक मदत करावी म्हणून साकडे घालताहेत व आपापल्या परीने मदत करतात. परवा सोलापुरातील लोकल टीव्हीवर श्री अभय कुमार कांती अध्यक्ष संत सेना सलून दुकानदार संघयांनी आपल्या मुलाखती द्वारे समाजाच्या व्यथा व अडचणी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या व काही उपाय सुचवले आहेत. हा काळ समाजाला मदत करण्याचा तर आहेच त्याचबरोबर समाजात जागृती उत्पन्न करून प्रबोधन करून खंबीर पणे पाठीशी उभे राहण्याचा आहे. महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण अमरावती समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहे. समाजाला लाभलेल्या समृद्ध वारश्यास वाचा फोडण्याचे काम पार पाडले ते प्रथम राज्यस्तरीय नाभिक साहित्य संमेलन यशस्वी रित्या संयोजन केले तेही विनावादविवाद. शिवाय एक अत्यंत सुंदर वैचारिक मांडणी केलेली स्मरणिका प्रसिद्ध केली आहे. या निमित्ताने “नाभिक समाजाची दशा व दिशा” याविषयावर लेखस्पर्धेत श्री किरण तुकाराम भांगे, चाकोरे, माळशिरस, सोलापूर यांनी अत्यंत परखड शब्दांत दिशादर्शक विचारमांडले होते. आज वेगवेगळ्या भागात अनेक समाज धुरीण आपल्या परीने समाजास मार्गदर्शन करीत आहेत. जसे मुंबईत श्रीमती चित्रा पवार, जळगाव मधून अँड. पुखराज, जबलपूहून महेन्द्र सेन, सोलापूरहून डा माधुरी.पारपल्लीवार वगैरे अनेक ज्ञात व अज्ञात सान थोर आहेत इथे सगळ्यांची नावे देणे जागेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. ही पार्श्र्वभूमी लक्षात घेऊन श्री संत सेना हरी मंदिर ट्रस्ट (रजि.) हुबळी यांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे. रामनवमीचा शुभदिनी ग्रोसरी किट्सचे वाटप सेना मंदिर जय चामराज नगर येथे केले तर एक दिवस अरविंद नगर हुबळी, गुरूद्वारा हुबळी येथे अन्ना ची पाकिटे गरजूंना वाटली. संत सेना हरी मंदिर रट्रस्टची स्थापना 2017.साली झाली असून ह.भ.प. श्री विठ्ठलराव आबाजी चटपल्ली हे प्रमुख आश्रय दाते असून, डॉ.विष्णुकांत शंकरराव चटपल्ली अध्यक्ष, श्री जगन्नाथ वि. चटपल्ली उपाध्यक्ष, श्री अनंत वि चटपल्ली सेक्रेटरी, श्री विनायक शं. चटपल्ली खजिनदार आहेत. दर वर्षी संत सेना महाराजांची पुण्यतिथी श्रावण वद्य द्वादशीला मोठ्या उत्साहात गेलेल्या पाच दशकांहून अधिक काळ साजरी केली

जाते. या ट्रस्टतर्फे २०१८ साली सेना महाराजांचे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड लिखित चरित्र व अभंगांचे पुस्तक दिमाखदार सोहळ्यात प्रकाशित केले होते. या समारंभाला मुरसाविर मठ हुबळीचे मठाधिपती, स्थानिक खासदार प्रल्हाद जोशी, माजी मुख्य मंत्री कर्नाटकराज्य, महापौर व पुणे,मुंबई,नागपूर,चंन्दपूर,सोलापूर,माथेरान,नांदेड, विजापूर येथील समाज बांधव उपस्थित होते. या लेखाचा उद्देश कोरोना महामारी निमित्ताने समाजात जागरूकता निर्माण करून विचार मंथन व्हावे, सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रखर आंदोलन उभे करावे व सरकारला या समाजाच्या अडचणीची विपन्नावस्थेची दखल घेऊन मदत करण्यास भाग पाडावे ही आहेतसेच यातून एखादे चांगले नेत्रुत्व उदयाला यावे समाजाचे एखादं स्वताचे वृत्तपत्र काढावे त्यासाठी प्रेरणा मिळावी हाच आहे. त्याच बरोबर टाटा सारख्या संस्थेतर्फे नाभिक समाजाचा सर्वांगीण अंगाने अभ्यास करून त्याआधारे सवलती दिल्या जाव्यात असे वाटते. तसेच लाकडाऊन संपल्यावर सलून बार्बर शाप व ब्यूटीपार्लर साठी नियमावली तयार करून धंदा सुरू करायला परवानगी द्यावी म्हणजे कारागीरांची उपासमार टळेल.

श्री. गुरूनाथ शंकरराव चटपल्ली
माडर्न हेअर कटिंग सलून
कोप्पीकर रोड, हुबळी,कर्नाटक

ट्रस्टीज,
श्री संत सेना हरी मंदिर ट्रस्ट (रजि) हुबळी.

आपण भरकटलो आहोत का?– प्रितम निकम, शहादा (9503232144)

नमस्कार

प्रिय समाज बांधवांनो कसे आहात ?

आपण सगळे क्षेम कुशल असाल अशी अपेक्षा आहे..

काळ कसोटीचा आहे परंतु आपल्याला वारसा सुद्धा संघर्षाचा आहे. हे सुद्धा दिवस निघून जातील तुम्ही आम्ही पुनः नव्याने जनजीवन सुरू करू पण आज लिहण्याच मुख्य कारण खरच दुःख होतंय समाज बांधवांना पुनः पुनः सांगून सुद्धा काही बांधव फक्त घरी जाऊन सेवा देत आहेत किंवा आपल्या घरी बोलवून सेवा देत आहेत.
खरं वाईट तेव्हा वाटलं काही समाज बांधवांकडे समाज प्रबोधनाच्या जबाबदाऱ्या आहेत ते सुद्धा घरी जाऊन सेवा देत आहेत.

पण लक्षात घ्या माझ्या वरिष्ठ माय बाप हो आपल्या समाजात कदाचित अगदी थोडेच बोटावर मोजण्या इतकेच लोक असे असतील खरंच त्यांचं घर दिवस भर काम केलं नाही तर धकवू शकत नाहीत.

परंतु ह्या काळात त्यांना चांगल्या पद्धतींने सांभाळण्याचे काम प्रशासन, समाजतील दान शूर व्यक्ती , विविध सामाजिक संघटना करीत आहेत.

हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच की अस म्हणतात सर सलामत तो पगडी पचास…
अजून थोडे दिवस तुम्ही घरात थांबलात आणि सगळे मिळून ठरवलं की कुणाचं ही काम करायचं नाही तर लोक सुद्धा तुम्हाला फोन करणार नाहीत किंवा घरी येऊन चक्कर मारणार नाहीत ह्याची सुरवात सगळ्यांनी फक्त हेव्या पोटी किंवा हव्यासापोटी केली आहे कारण तो करतोय मी का नको करू ?

एवढंच कारण तुम्हा आम्हा सगळ्यांना पुरेस आहे. पण एवढं सहज सोप्या पद्धतीने कसे तुम्ही करू शकता?
सध्या मेडिकल वर मेडिसिन घ्यायला गेलात तरी बाहेर सॅनिटायझर ची फवारणी करणारा वेगळा व्यक्ती उभा असतो , सगळे कीती प्रोटेक्शन घेऊन आपलं काम करीत आहेत.

आणि आपण काय करतोय याचा विचार नक्की करा तुमच्या अंतर्मनाला ज्या वेळी हे सगळे प्रश्न कराल तेव्हा याची उत्तर नक्कीच मिळतील.

आणि तुम्ही हे सगळं सोडून घरात काहीच नसल्याचा आव आणून सेवा दिलीत जरी तरी तुम्हाला काय मिळालं लोकांचा घरातली तुच्छ वागणूक , फेसबुक , व्हाट्सअप्प वरती आई बहीण काढणाऱ्या गलिच्छ लोकांचा शिव्या…
तुमच्या समजा साठी फिरणारे व्यवसायाला बदनाम करणारे घाणेरडे मेसेज अजून ही वेळ गेली नाहीये स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या नक्किच हे सुद्धा दिवस जातील…

हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच आताच न्युज चॅनल वर बातमी पहिली मध्यप्रदेश मधल्या खरगोन मध्ये एका कोरोना पोस्टिव्ह रुग्णाचे केशकर्तन केल्या मुळे सहा लोकांचे अहवाल पोस्टिव्ह आले आहेत… मग उद्या तुम्ही आणि तुमचा समाज खुनी आहे असं लोकांनी म्हटलं तर आश्चर्य वाटू देऊ नका.

समजा प्रति काही देणं लागतो आणि हेच तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर कुणाला ही सेवा देऊ नका🙏🏻 घरी रहा सुरक्षित रहा संयम ठेवा…

तळ टीप – मी माझे वयक्तिक विचार सदर पोस्ट मध्ये मांडले आहेत हा वैचारिक लेख नाही मनात आलेले विचार प्रकट केले आहेत तुमच्या सूचनांचा आदर केला जाईल शक्य असल्यास नावा निशी फॉरवर्ड करण्यास हरकत नाही…

प्रितम निकम शहादा ✒️ ९५०३२३२१४४

हिच ती वेळ महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार निर्मितीची
हिच ती वेळ पर प्रांतियांचे व्यावसाय हातात घ्यायची
हिच ती वेळ उद्योजक आणि व्यावसायिक बनण्याची – सोमनाथ काशिद

हिच ती वेळ महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार निर्मितीची
हिच ती वेळ पर प्रांतियांचे व्यावसाय हातात घ्यायची
हिच ती वेळ उद्योजक आणि व्यावसायिक बनण्याची

मी काशिद बंधु आंबे वाले म्हणून व्यावसाय सुरू केला आहे
फळे आणि पालेभाजी विक्री व होम डिलीव्हरी सर्व्हिस चे अॅप बनवून घेतला आहे

चला निर्णय घ्या. हीच ती वेळ –

येणाऱ्या मे जून मधे नवीन व कमी भांडवलात कमाईची संधी आहे. फक्त आता तरी प्रेस्टीज इशू करू नका. या हातगाड्या लावण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती मिळवा.

यूपी, बिहारी सगळे घरी पळाले आहेत!

आपल्या मुलांना विनंती आहे, घरीच आहात तर वडा, समोसा, डोसा, सांभर, इडली-चटणी, पोहे, शिरा, उपमा, उपीट असले नाष्ट्याचे पदार्थ बनवायचे घरी शिका. पाणीपुरी बद्दल पण माहिती घ्या. आई, बहीण, आज्जी यांच्या सारख्या कडून शिकून घ्या…

युपी, बिहारी यायच्या आत आपल्या पोरांच्या हातगाड्या लागल्या पाहिजेत. चांगली संधी चालून आली आहे. परत बोंबलू नका काम मिळत नाही म्हणून.

दादा,आण्णा,भाऊ, साहेब हे आमचे नेते, जरा राजकीय ताकतीचा वापर करून पोरांना गाडी लावायची परवानगी महापालिके कडून घेऊन द्या.

या निमित्ताने आमचा तुमचा नेता कळून येईल. फक्त निवडणुकीपूरता वापर करू नका पोरांचा.

कार्यकर्त्यांनी पण थोडं स्वार्थी व्हावे.
इतके दिवस काम केले ना पक्ष नेत्यांचे आता हक्काने जागा मागा हातगाडी लावायला वडापावची.

अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही

हा संदेश सामाजिक माध्यमातून सर्वत्र सामायिक केला जात आहे. याचा जरुर विचार करा.

आवडली तर जरूर शेअर करा वाचून किंवा बघून काही उद्योजक घडतील हिच अपेक्षा व हिच सर्वात मोठी समाजिक सेवा

आपला जनसेवक
सोमनाथ काशिद
हडपसर पुणे

नाभिक समाजाला IT CELL chi गरज.?

नमस्कार माझ्या तमाम नाभिक समाजातील बंधू आणि भगिनींनो..
काळ बदल रूपाने आपणही आपले स्वरूप बदलून नवीन दिशा निश्चित करणे गरजेचे आहे..
ह्याच अनुषंगाने आपण आपल्या नाभिक समजाची IT CELL निर्माण करावी ..ह्यार विषयी तुमचे मत काय..?

कमेंट करा तुमचा नंबर आणि मत (yes/no)

Link vr click Karun hi पाठवा https://wa.me/917820890511

Regards SHREYAS DHAMORE ,IT PROFESSIONAL

महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ,महाराष्ट्र तर्फे विचारमंथन म्हणून निष्पक्ष असा एक ऑनलाइन नाभिक समाजातील सगळ्या साठी खुला परिसंवाद आयोजित केला आहे. विषय आहे..
कसा असेल करोना नंतरचा माझा नाभिक समाज व आपला व्यवसाय? तसेच समाजापुढील आर्थिक व सामाजिक आव्हाने

आदरणीय

नाभिक समाजबंधुंनो नमस्कार

आज आपला नाभिक समाज अत्यंत वेगळ्या प्रतिकूल परिस्थितीतुन जात आहे,या परिस्थितीला अनुसरुनच पुढील येणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे, याकरिताच महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ,महाराष्ट्र तर्फे विचारमंथन म्हणून निष्पक्ष असा एक ऑनलाइन नाभिक समाजातील सगळ्या साठी खुला परिसंवाद आयोजित केला आहे. विषय आहे..
कसा असेल करोना नंतरचा माझा नाभिक समाज व आपला व्यवसाय? तसेच समाजापुढील आर्थिक व सामाजिक आव्हाने
आपल्या सगळ्यांच्या डोक्यात असंख्य विचार असतील , प्रश्न आहे त्यावर मार्ग सुद्धा आहे, आपणास वाटत आहे असे होईल व त्यावर असे केल्यास योग्य राहील,आणि मी माणूस आहे,त्यात नाभिक आहे,मला बुद्धि आहे ,म्हणून माझ्याजवळ विचार आहे,म्हणून मी ते प्रकट करायलाच पाहीजे,मग व्हा तयार,आणि व्यक्त ..आणि समाजा प्रति व्यक्त होण्याकरिता यासारखी चांगली वेळ व संधि महाराष्ट्रातील अनेक नामवंत नाभिक सहित्यिकांचा सहभाग असलेला महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण सारखा मंच ..फक्त 250 शब्दात व्यक्त व्हा.आणि महाराष्ट्राच्या नाभिक समाजात आपले विचार पोहचू दया.चला तर मग येऊ दया आपले लिखाण खालील वाट्सएप्प नम्बर वर . आकर्षक उत्तेजनार्थ बक्षीस व ऑनलाइन सर्टिफिकेट..व्यक्त होण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2020

:संपर्क:
मुख्य समन्वयक

श्री सतीश कन्हेरकर,नागपुर
मो न.9423403382

समन्वयक

*श्री बेलाड़कर,मूर्तिजापुर,अकोला
मो न.9423431301
*श्री अशोक कुबड़े, नांदेड़
मो न.9767192303
*श्री दिनेश एकवनकर,चंद्रपुर
मो न.9404536295
*श्री मल्लेवार,पुणे
मो न.9561084091
*श्री श्रीधर राजनकर,आकोट अकोला
मो न. 9960433928
*श्री शशिकांतजी वखरे,अकोला
मो न.9604541145
*श्री मनोज बोरगावकर, धुळे
मो न. 8830035897
*श्री संजय पंडित,मुम्बई
मो न.9819637461
*श्री संतोष रेलकर,वरणगांव, जि जळगाव
मो न.9922127371
*श्री नवनाथ घोड़के,औरंगाबाद
मो न.9545324004
*सौ. भारतीताई सोनवणे,जि जळगाव
मो न.9960094043
*श्रीमती पारपल्लीवार ताई,सोलापुर
मो न.8007294586

मुख्य समीक्षक
*प्रो. डॉ. श्री विनोद गायकवाड़, बेळगांव
*समीक्षक*
*श्री राजेन्द्र अमृतकर,अंमरावती
*श्री श्यामजी आस्करकर , नागपुर ,
*श्री .गजानन शेळके, अकोला
*प्रा. डॉ. श्री. यशवन्त घूमे, चंद्रपुर
*श्री. प्रवीण बोपुलकर, मुम्बई

विनीत

शरद ढोबळे,अध्यक्ष,
महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ,महाराष्ट्र


त.टिप. सगळ्या बाबतीत अंतिम निर्णय हा आयोजकाचा राहिल.


Update मिळिण्याकरिता दिलेल्या लिंक वर क्लिक करून hi पाठवा

नाभिक समाजातील विविध योजनांची माहिती ,
जनसंपर्क , उपाय योजना इतर कोणत्याही, हक्काचं व्यासपीठ
आणि समाज संघटित. Update मिळिण्याकरिता खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर hi पाठवा..

Follow this link to message me on WhatsApp: https://wa.me/917820890511

कोरोनामुळे केश कर्तनालय – सलून व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण – समस्या व त्यावरील उपाय – मार्गदर्शक तत्वे -डाॅ संदीप कडवे

*कोरोनामुळे केश कर्तनालय – सलून व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण – समस्या व त्यावरील उपाय – मार्गदर्शक तत्वे *
लोकडाऊन नंतर जेव्हा सलून सुरु होतील. सलून हि जवळपास अत्यावश्यक सेवा आहे. कोरोनाचा धोका पुढील काही महिने तरी कायम राहणार आहे. तेव्हा काम कसे करायचे असा प्रश्न नाभिक कारागिरांना व मालकांना पडला आहे. सलून मध्ये काम करतांना सर्व नाभिक कारागिरांचा ग्राहकाशी थेट संपर्क येतो. येणाऱ्या ग्राहकांमध्ये कोण आजारी आहे हे कळत नाही. कुणी शिंकले, खोकले तरी व्यावसायिकांना, कारागिरांना, येणाऱ्या ग्राहकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. ग्राहकांमध्ये देखील यासंबंधी काळजीचे वातावरण आहे.
यावर उपाय म्हणून डॉ संदीप कडवे यांनी खालील मार्गदर्शक तत्वे नाभिक मंडळांना / नाभिक महामंडळाला सुचवली आहेत. यावर चर्चा करून नाभिक मंडळांनी / महामंडळाने आपली मार्गदर्शक तत्वे सर्व ग्राहकांसाठी लागू करावी अशी विनंती केली आहे.

१. आजारी माणसांनी स्वतःहून केश कर्तनालयात येऊ नये. आल्यास त्यांना प्रवेश नाकारण्याचा सर्व हक्क सलून व्यवस्थापनाला असेल. प्रसंगी दंड देखील करण्यात येईल. अधिक आक्रमक ग्राहकांची नावे पोलीस प्रशासनाला कळवण्यात येतील व त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
२. येणाऱ्या सर्व ग्राहकांनी चेहऱ्यावर मास्क लावावा. कारागिरांनी देखील तोंडावर कायम मास्क लावावा.
३. ग्राहकाची दाढी करतांना ग्राहकाचा फक्त मास्क काढला जाईल.
४. येणाऱ्या सर्व ग्राहकांनी स्वतःसाठी मोठा नॅपकिन, पंचा आणावा जो मानेभोवती/अंगाभोवती गुंडाळता येईल. केस कापून झाले, दाढी करून झाली कि हा पंचा ग्राहकाने घरी घेऊन जावा. काही आठवड्यानंतर सलून मध्येच असे पंचे ग्राहकांसाठी विकत मिळतील.
५. जे ग्राहक स्वतःचा पंचा घेऊन येणार नाहीत, त्याच्यासाठी निर्जंतुक केलेला, न वापरलेला पंचा (जमल्यास डिस्पोझेबल किंवा एकदा वापरून मग धुण्यात येणारा) उपलब्ध करून देण्यात येईल त्याचा प्रत्येकी १५ रुपये वेगळा शुल्क आकारण्यात येईल. नंतर हे देखील सेवा बंद करण्यात येऊन सर्व ग्राहकांनी स्वतःचे पंचे विकत घ्यावे लागतील.
६. केस कापणे, दाढी करणे, या साठी एका ग्राहकांमागे १५ रुपये अधिक स्वच्छता शुल्क आकारण्यात येईल. याचा उपयोग सलून मध्ये अधिकची स्वच्छता राखणे, कात्री, वस्तरा वारंवार निर्जंतुक करणे, फरशी वारंवार झाडणे, डेटॉल ने फरशी व खुर्ची पुसणे या कामाकरता केला जाईल. सर्व ग्राहक चपला बूट दुकानाबाहेर काढतील. यासाठी जमल्यास एका स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल.
७. येणाऱ्या सर्व ग्राहकांचे नोंदणी रजिस्टर बनवण्यात येईल. यात ग्राहकाचे नाव, मोबाईल फोन, पत्ता वय, लिहिण्यात येईल.
८. कारागिरांच्या स्वच्छतेविषयी व आरोग्याविषयी अधिक काळजी घेण्यात येईल. आजारी कारागीर कामावर येणार नाहीत. किरकोळ सर्दी,ताप, खोकला यासाठी कारागीर कामावर न आल्यास सुरवातीचे ३ दिवस रजा पगारासहित देण्यात येईल. हा खर्च आपत्कालीन निधी मधून करण्यात येईल.
९. कारागिरांचा आरोग्य विमा काढण्यात येईल.
१०. प्रत्येक सलूनमध्ये दररोजच्या उत्पन्नातून एक आपत्कालीन निधी गोळा केला जाईल. हा निधी पुढे येणाऱ्या अशा लोकडाऊन, साथीचे आजार, कारागीर आजारी पडला तर पहिले तीन दिवस पगार, या सारख्या कामासाठी वापरण्यात येईल.
११. सलूनमध्ये पूर्व अपॉइंटमेंट घेऊन मगच येण्याची व्यवस्था राबवण्यासाठी तंत्रज्ञनाचा वापर करण्यात येईल, ज्यामुळे एका वेळी ४ पेक्षा अधिक ग्राहक दुकानात जमणार नाहीत. सुरवातीला मोबाईल चा वापर करून अपॉइंटमेंट देण्यात येईल. त्यानंतर पूर्व बुकिंग करून पूर्व पेमेंट करूनच ग्राहकाला प्रवेश देण्यात येईल.
१२. घरी जाऊन सेवा देणे बंद करण्यात येईल किंवा परिस्थितीनुसार ठरवण्यात येईल. बंधनकारक नसेल.
डाॅ संदीप कडवे

To receive Nabhikdaily.com send hi to below link whatsup number

” नम्र विनंती “
सर्व नाभिक समाजातील आपल्या बांधवसाठी एक महत्व-पूर्ण संदेश –
आपल्या समाजातील हितकारक विविध योजनांची माहीती ,सवांद ,जनसंपर्क , विविध उपाययोजना .
सामाजिक संघटन . इतर कोणत्याही नाभिक समाजातील हितकारक , महत्वपूर्ण ,सामाजिक गोष्टी ,दैनंदिन घडामोडी अगदी सहजपणे मिळवन्यकरीता लिंक वर क्लिक करून Hi पाठवा.
https://wa.me/917820890511

ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत विशाखा सुभाष गणोरकर ही नाभिक कन्या असून त्यांनी सहभाग नोंदवला आहे, तिला स्पर्धा जिंकन्यासाठी गरज आहे तुमच्या एका like ची

नमस्कार,
पुणे वक्तृत्व व वाद मंडळ आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत विशाखा सुभाष गणोरकर ही नाभिक कन्या असून त्यांनी सहभाग नोंदवला आहे, तिला स्पर्धा जिंकन्यासाठी गरज आहे तुमच्या एका like ची.
कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून विशाखाच्या वीडियो ला like करावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा वीडियो पाठवावे ही विनंती.
धन्यवाद.
विषय ● आपण भयंकराच्या दारात उभे आहोत.

I Vishakha Subhash Ganorkar daughter of Nabhik Family, participated in an online elocution competition held by Pune council. 
Your one like can help me to win.
Please blessed me with your precious like.

And share with your friends and family.
Thank you.